spot_img
spot_img

वय लहान, भरारी थेट दिल्ली विधानसभेत! लोणारचा विनायक राष्ट्रीय पर्यावरण बाल संसदेत; प्रतापराव जाधवांकडून सत्कार अन् कौतुकाची थाप!

लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार) सातवीत शिकणाऱ्या लोणारच्या विनायकने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर थेट देशाच्या राजधानीत भरारी घेतली आहे! बुलढाण्यातील सहकार विद्या मंदिरचा विद्यार्थी विनायक राजेश मापारी याची राष्ट्रीय पर्यावरण बाल संसद २०२६ साठी निवड झाली असून, दिल्ली विधानसभेत पर्यावरण संवर्धनावर विचार मांडण्याची संधी त्याला मिळाली आहे.

या कामगिरीची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री खा. प्रतापराव जाधव यांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी विनायकचा सत्कार केला. त्याच्याशी मनमोकळा संवाद साधत शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली आणि पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. लोणारच्या विद्यार्थ्याची ही भरारी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

केवळ सत्कारच नव्हे, तर चार दिवसांच्या वास्तव्यासाठी आपल्या निवासस्थानी राहण्याची व्यवस्थाही जाधव यांनी केली! या सहकार्याबद्दल विनायकने त्यांचे आवर्जून आभार मानले.

लहान वयापासून पर्यावरणाची जाण, सामाजिक जबाबदारी आणि नेतृत्वगुण विकसित होण्याची गरज जाधव यांनी व्यक्त केली. शिक्षणासोबत पर्यावरणविषयक उपक्रमांत सक्रिय राहून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

सत्कारावेळी कामगार विमा मंडळाचे राज्य संचालक सोहम वायाळ आणि विनायकचे वडील, चिखली पोलीस ठाण्यात कार्यरत राजेश मापारी उपस्थित होते.लोणार ते दिल्ली विधानसभा हा विनायकचा प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्याच्या निवडीचे शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!