spot_img
spot_img

BIG BREAKING! कव्वालीनंतर वाद पेटला… देऊळगाव राजात रक्तरंजित रात्र! दोन गटांच्या तुफान राड्यात नगरसेवकासह एकाच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती; पोलीस ठाण्यासमोरच भिडले गट?

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) कव्वालीच्या सुरांनंतर शहरात हिंसाचाराचा थरार घडल्याची धक्कादायक प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज सोमवारी, ५ ऑक्टोबरच्या रात्री 9.30 दरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक शेख अनवर अली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी संबंधित आरिफ पठाण यांचा मृत्यू झाल्याचे समजते

प्राथमिक माहितीनुसार, शहरातील कव्वाली कार्यक्रमादरम्यान काही कारणावरून वाद झाला. कार्यक्रम संपल्यानंतरही धुसफूस थांबली नाही. उलट वाद चिघळत गेला आणि दोन गट आमनेसामने आले. पोलीस ठाण्यासमोरच हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे.

लहान मुलांच्या भांडणातून वादाला सुरुवात झाल्याची चर्चा परिसरात आहे. त्यातून जुना राजकीय वाद उफाळल्याचेही बोलले जात आहे. तथापि, या दोन्ही बाबींना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे हाणामारीचे नेमके कारण आणि राजकीय संबंध याबाबत तपासातूनच स्पष्टता येणार आहे.

हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने शहरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. परिसरात तणाव असल्याचेही समजते पोलीस फौज फाटा मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे सध्या परिसरात तणावचे वातावरण आहे

वाद इतका विकोपाला कसा गेला? हिंसाचारात कोण सहभागी होते? पोलीस ठाण्यासमोर गट भिडल्याची माहिती खरी असल्यास हा प्रकार रोखण्यात अडथळा कुठे आला? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे आता पोलीस तपासातून अपेक्षित आहेत. दोन जीव गेल्याच्या प्राथमिक वृत्तामुळे घटनेची तातडीने, निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

दरम्यान, आरोपींची नावे, वापरण्यात आलेली शस्त्रे किंवा अटकेबाबत अधिकृत तपशील उपलब्ध नाहीत. अफवांना खतपाणी न घालता नागरिकांनी शांतता राखावी.

ही बातमी उपलब्ध प्राथमिक माहितीवर आधारित आहे. पोलिसांची अधिकृत माहिती मिळाल्यानंतर ‘हॅलो बुलढाणा’ अपडेट प्रसारित करेल.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!