spot_img
spot_img

अभिनंदन तर व्हायला हवे! बुलढाण्याच्या सुवर्णकन्या डॉ. रश्मी लोखंडे यांनी पटकावले राज्यस्तरीय सुवर्णपदक! बुलढाणा जिल्ह्याचा मान दिल्लीच्या दरबारात उंचावला!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील प्रसिद्ध बालदंतरोग चिकित्सक डॉ. रश्मी सुनील लोखंडे (सालकुटे) यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि कर्तृत्वाची सुवर्णमुद्रा उमटवत आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे.

M.D.S. (Pediatric and Preventive Dentistry) या विषयामध्ये राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांना ISPPD (Indian Society of Pedodontics and Preventive Dentistry) यांच्या वतीने दिल्ली येथे आयोजित परिषदेत सन्मानित करण्यात आले. यावेळी ISPPDच्या अध्यक्षांच्या हस्ते त्यांना Gold Medal (सुवर्णपदक) आणि प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.

डॉ. रश्मी लोखंडे (सालकुटे) या बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या महिला बालदंतरोग चिकित्सक म्हणून कार्यरत असून, आजपर्यंत त्यांनी जिल्हाभरातील हजारो बालरुग्णांवर यशस्वी उपचार व दंतप्रक्रिया करून त्यांच्या चेहऱ्यावर निरागस हास्य फुलविले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय यशासोबतच बालरुग्णांप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता आणि समर्पित सेवा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विशेष ओळख आहे.

या अभूतपूर्व यशाचे श्रेय डॉ. रश्मी यांनी आपल्या आई-वडिलांना, कुटुंबीयांना तसेच आपल्या मार्गदर्शक व मेंटर डॉ. नागरत्ना पी. जे. यांना दिले आहे. त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत डॉ. नागरत्ना पी. जे. यांनी केलेले मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि मोलाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या शैक्षणिक प्रवासाला योग्य दिशा मिळाली, अशी भावना डॉ. रश्मी यांनी व्यक्त केली.

डॉ. रश्मी यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे पालक श्री. सुनील लोखंडे, डॉ. गोपाल लोखंडे, तसेच श्री. प्रकाश सालकुटे, सौ. मंदा सालकुटे आणि प्रा. रोहित सालकुटे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बुलढाण्याच्या मातीतून दिल्लीपर्यंतचा हा सुवर्णप्रवास निश्चितच संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!