spot_img
spot_img

BIG EXCLUSIVE | सीओ साहेब, खुर्चीतून उठा… चिखलीकरांचा जीव वाचवा! नसबंदीवर लाखोंचा खर्च, तरी रस्त्यावर कुत्र्यांची दहशत; आता ‘हॅलो बुलढाणा’च्या प्रतिनिधीच्या मेव्हण्यालाही चावा! आणखी कोणाच्या जखमेची वाट पाहताय?

चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) कुत्र्यांच्या नसबंदीवर लाखो रुपये खर्च झाल्याचे सांगितले जाते; पण चिखलीकरांच्या वाट्याला आजही चावे, भीती आणि जीवघेणी पळापळच येत आहे! ‘हॅलो बुलढाणा’ने श्वानदंशाची गंभीर आकडेवारी आणि नसबंदी प्रक्रियेतील प्रश्न समोर आणल्यानंतरही शहरातील धोका कायम आहे. आता प्रतिनिधी सय्यद साहिल यांचे मेव्हणे, आनंदनगरातील रहिवासी अयात सादिक यांना घरासमोर उभे असताना कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती मिळाली आहे. सीओ साहेब, नागरिकांनी घरासमोर उभे राहतानाही घाबरायचे का?

 

यापूर्वी सूचना देऊनही संबंधित यंत्रणेने काळजी घेतली नसल्याचा आरोप होत आहे. प्रत्येक घटनेनंतर नागरिकांनीच उपचारासाठी धावायचे, त्रास सहन करायचा आणि पुन्हा त्याच रस्त्यावर भीतीने चालायचे; मग नगरपालिकेच्या आरोग्य विभागाची जबाबदारी नेमकी कुठे सुरू होते?

जुन्या मेहकर रस्त्यावर प्रवास की जीव वाचवण्याची कसरत?

खंडागळे हॉस्पिटलसमोरील जुन्या मेहकर रस्त्यावर परिस्थिती आणखी धोकादायक असल्याचे नागरिक सांगतात. रात्री कामावरून परतणारे दुचाकीस्वार आणि रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांच्या अंगावर कुत्र्यांचे घोळके धावतात. घाबरलेले चालक वेग वाढवतात आणि समोरील गतिरोधकावर दुचाकी उसळते. पाहणाऱ्यांना तो ‘स्टंट’ वाटेल; प्रत्यक्षात ती कुत्र्यांपासून जीव वाचवण्याची धडपड असते!

अशावेळी दुचाकी घसरली, मागे बसलेला रुग्ण पडला किंवा गंभीर अपघात झाला, तर जबाबदारी कोण स्वीकारणार? सीओ साहेब, उपाययोजनांसाठी दुर्घटनेचे निमंत्रण मिळणे आवश्यक आहे का?

आकडे मोठे; प्रशासनाचे उत्तर कुठे?

‘हॅलो बुलढाणा’च्या पूर्वीच्या वृत्तात नमूद केलेल्या माहितीनुसार, चिखलीत ४६ महिन्यांत ११,६०० हून अधिक श्वानदंश नोंदले गेले आहेत. जिल्ह्याचा आकडा सव्वा लाखापार असल्याची माहितीही त्या वृत्तात मांडण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते सचिन राठी आरोग्य विभागाकडील माहिती आणि कागदपत्रांचा पाठपुरावा करीत आहेत.

नसबंदी झाली म्हणजे चावे तात्काळ थांबतील, असे नाही; मात्र खर्चाचा हिशेब, लसीकरण, तक्रारींवरील कार्यवाही आणि धोकादायक ठिकाणांवरील उपाययोजनांची उत्तरे प्रशासनाने द्यायलाच हवीत. किती कुत्र्यांची नसबंदी झाली? त्याची पडताळणी कोणी केली? कोणत्या भागात लसीकरण झाले? नागरिकांच्या सूचनांवर काय कारवाई केली? बिलांबरोबर प्रत्यक्ष कामाचा तपशीलही जनतेसमोर ठेवा!

शहरात भीती वाढत असताना पालिकेच्या फाइलमधील आकडे नागरिकांचे संरक्षण करू शकत नाहीत. घराबाहेर पडणारे मूल, कामावरून परतणारा कामगार आणि उपचारासाठी निघालेला रुग्ण यांना सुरक्षित रस्ता हवा आहे. त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांनी परिसर पाहून ठोस कृती करणे गरजेचे आहे.

सीओ साहेब, चिखलीकरांना कागदी समाधान नको; रस्त्यावर सुरक्षितता हवी! 

आनंदनगर आणि जुन्या मेहकर रस्त्याची तातडीने पाहणी करा, नियमानुसार श्वान नियंत्रण व लसीकरणाची कार्यवाही करा आणि नागरिकांसाठी स्पष्ट तक्रारव्यवस्था जाहीर करा. नसबंदीच्या खर्चाची कागदपत्रे उपलब्ध करून संशय दूर करा

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!