बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा पत्रकार संघाच्या ‘वृत्तेश्वरा’ला काल वाजत गाजत भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला.या विसर्जन मिरवणुकीतील लक्षवेधी गोरीलाच्या नृत्याविष्काराने सांस्कृतिक माहोल तयार केला होता.
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात बुलढाणा शहरात लाडक्या बाप्पाला अत्यंत भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. शहरातील विविध मंडळांसोबतच बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आयोजित ‘वृत्तेश्वर’ गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचेही मोठ्या थाटामाटात व उत्साहात विसर्जन झाले.
विसर्जन मिरवणुकीत जिल्ह्यातील ज्येष्ठ व तरुण पत्रकार, छायाचित्रकार आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गुलालाची उधळण आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर पत्रकार बांधवांनी शिस्तबद्ध वातावरणात ‘वृत्तेश्वर’ गणपतीला निरोप दिला. शहरातील विसर्जन मार्गांवर आणि घाटांवर प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. अत्यंत शांततेत व उत्साहात गणेशोत्सवाची सांगता झाली.











Total Users : 3515549