spot_img
spot_img

कर्जमाफी झाली, पैसे आले; तरी पीककर्जासाठी बँकेच्या दारात ठिय्या! IOB एकलारा शाखेत चार तास ‘हायव्होल्टेज’ आंदोलन; कलेक्टरांच्या हस्तक्षेपानंतर तातडीच्या कार्यवाहीचे आदेश!

चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) शासनाने कर्जमाफी जाहीर केली, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यासाठी पैसेही आले; पण कर्जखाती बंद नाहीत आणि नवीन पीककर्जही मिळत नाही! इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एकलारा शाखेतील या संतापजनक प्रकाराविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी शेतकऱ्यांसह थेट बँकेत धडक देत तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केले.

 

एकलारा शाखेतील तब्बल २८८ शेतकरी कर्जमाफीस पात्र असल्याचे सांगितले जात आहे. मात्र कर्जमाफीची रक्कम प्राप्त होऊनही संबंधित खाती निकाली निघाली नसल्याने शेतकऱ्यांवर व्याजाचा मीटर सुरूच आहे. एवढेच नव्हे, तर २३ नवीन कर्जप्रकरणे प्रक्रियेत असूनही एकाही पात्र शेतकऱ्याला पीककर्ज मिळाले नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

भोरसा-भोरसी येथील शेतकरी गोपाल ढोरे यांच्या कर्जाची मुद्दल व व्याजासह रक्कम सुमारे २ लाख ३५ हजार रुपये होती. शासनाकडून १ लाख ३५ हजार रुपये कर्जमाफी मिळूनही खाते बंद न झाल्याने, NPA खात्यावर महिनाभरात सुमारे ११ हजार रुपये अतिरिक्त व्याज वाढल्याचे सरनाईक यांनी सांगितले. “शासनाने पैसे दिले, तरी शेतकऱ्याने वाढीव व्याज का भरावे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

चार तासांच्या आंदोलनादरम्यान सरनाईक यांनी जिल्हाधिकारी डॉ. देवरे, तहसीलदार सवडे, LDM, सहाय्यक निबंधक आणि IOBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी बँक व्यवस्थापकांशी चर्चा करून पात्र शेतकऱ्यांच्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या आठवडाभरात कर्जखाती बंद करा, निल दाखले द्या आणि पीककर्ज मंजूर करा; अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा विनायक सरनाईक आणि शेतकऱ्यांनी दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!