खामगाव (हॅलो बुलढाणा) हातात मोबाईल… स्क्रीनवर QR कोड… आणि काही सेकंदांत पेमेंट! आजच्या ‘जेनझी’ पिढीसाठी व्यवहार म्हणजे UPI, कार्ड आणि डिजिटल वॉलेट. पण कधी काळी व्यवहारासाठी दगडी चलन, धातूची नाणी आणि विविध राजवटींची मुद्रा वापरली जात होती, हेच या डिजिटल पिढीला प्रत्यक्ष दाखवून देणारा अनोखा उपक्रम खामगावात रंगला.
भाऊसाहेब उपाख्य शंकरराव बोबडे यांच्या जयंती सप्ताहानिमित्त गो. से. महाविद्यालय, खामगाव येथे प्राचीन आणि मराठाकालीन दुर्मिळ नाण्यांची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. या प्रदर्शनीतून भारतीय चलन व्यवस्थेचा शेकडो वर्षांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर अक्षरशः उलगडून ठेवण्यात आला.
दगडी स्वरूपातील प्राचीन व्यवहार साधनांपासून विविध धातूंची नाणी, मराठाकालीन मुद्रा, पुढे कागदी नोटांचा जमाना आणि आता थेट मोबाईलमधून होणारे डिजिटल व्यवहार हा संपूर्ण प्रवास पाहताना विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला अक्षरशः उधाण आले.
आज एका क्लिकवर हजारो रुपयांचा व्यवहार होतो; पण त्या एका क्लिकमागे चलन व्यवस्थेने किती मोठा ऐतिहासिक प्रवास केला, याची जाणीव या प्रदर्शनीने करून दिली.विशेष म्हणजे, इतिहास केवळ पुस्तकात वाचण्याऐवजी प्रत्यक्ष दुर्मिळ नाणी पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाल्याने या उपक्रमाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले











Total Users : 3507066