spot_img
spot_img

धामणगाव बढे परिसरातील रखडलेली रस्त्यांची कामे तातडीने सुरू करा; अन्यथा ..!

धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा/सादिक बिस्मिल्लाह शेख)धामणगाव बढेपरिसरातील मंजूर झालेल्या तसेच कार्यारंभ आदेश प्राप्त झालेल्या रस्त्यांची कामे अद्याप प्रत्यक्षात सुरूझाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्यात यावीत, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे.

दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी देण्यात आलेल्या निवेदनात धामणगाव बढे व परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच वाहनधारकांच्या दळणवळणासाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांची कामे प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात पुढील रस्त्यांचा समावेश आहे

1. म्हाळुंगी–पिंपळगाव देवी रस्ता, धामणगाव बढे – कार्यारंभ आदेश दि. २४ ऑगस्ट २०२६.

2. धामणगाव बढे ते पान्हेरा रस्ता – कार्यारंभ आदेश दोन वर्षांपूर्वी.

3. धामणगाव बढे ते पेंचलींग रस्ता – कार्यारंभ आदेश दोन वर्षांपूर्वी.

4. धामणगाव बढे ते पाणीपुरवठा विहीर रस्ता – कार्यारंभ आदेश दोन वर्षांपूर्वी.

5. धामणगाव बढे ते पिंपळगाव देवी रस्ता, ६०० मीटर – कार्यारंभ आदेश दोन वर्षांपूर्वी.

या रस्त्यांची सद्यस्थिती अत्यंत खराब असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करताना अडचणी येत असून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाही खराब रस्त्यांमुळे गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कार्यारंभ आदेश होऊनही प्रत्यक्ष काम सुरू न होणे ही गंभीर बाब असून संबंधित विभागाने रस्त्यांच्या कामांना होत असलेल्या विलंबाची तातडीने दखल घेऊन ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन कामे सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रमुख मागण्या :

मंजूर रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करावीत.

प्रत्यक्ष काम सुरू करण्याची तारीख व अपेक्षित पूर्णत्वाची तारीख नागरिकांना कळवावी.

कामात विलंब करणाऱ्या ठेकेदारांकडून कारणमीमांसा घेऊन आवश्यक कारवाई करावी.

रस्त्यांच्या कामाचा दर्जा व प्रगती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित पाहणी करावी.

निर्धारित कालावधीत कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने लेखी आश्वासन द्यावे.निवेदन देता वेळी तालुका प्रमुख रामदास चौथनकर, माजी सरपंच भागवत दारखे, किसना भोरे,शिवसेना शहर प्रमुख मोहन सपकाळ, उपशाखाप्रमुक राजेश जाधव, अजिंक्य जाधव सुनील दांडगे, राईस कुरेशी आदी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!