spot_img
spot_img

BIG BREAKING! मंत्रालयातून थेट बुलढाण्याच्या बांधावर! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाहणार दुष्काळाची दाहकता; खामगाव-मोताळ्यात तब्बल सहा गावांचा झंझावाती दौरा!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कागदावरची पावसाची आकडेवारी एकीकडे आणि शेतकऱ्यांच्या बांधावर करपलेली पिके दुसरीकडे… बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मृद जलसंधारण मंत्री संजय राठोड आज, बुधवार २३ सप्टेंबर रोजी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उतरणार आहेत.

उपमुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केलेल्या दौरा कार्यक्रमानुसार मुंबईहून अमरावती आणि अकोला मार्गे शिंदे दुपारी विदर्भातील दुष्काळी पट्ट्यात दाखल होणार आहेत. अकोला जिल्ह्यातील दधम आणि व्याळा येथील पाहणीनंतर त्यांचा ताफा थेट बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

दुपारी १.१० वाजता खामगाव तालुक्यातील कलोरी येथे ते दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर भादोला, तसेच मोताळा तालुक्यातील खडकी खामखेड, रोहीणखेड, टाकळी आणि तिघ्रा या गावांमध्ये प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन परिस्थिती जाणून घेण्याचे नियोजन आहे.

जिल्ह्यात अनेक भागांत दीर्घ पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून सातत्याने होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत प्रशासनाला कोणते निर्देश मिळतात आणि मदतीसंदर्भात सरकारकडून पुढे काय निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दुपारी ३.३० वाजता खामगाव येथील सिद्धिविनायक टेक्निकल कॉलेज हेलिपॅडवरून शिंदे छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!