spot_img
spot_img

EXCLUSIVE हा ठेका कुणाचा? पडदा उघडला अन् समोर होते CEO गुलाबराव खरात!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कारभारात शिस्त, निर्णयक्षमता आणि शेतकऱ्यांविषयीचा जिव्हाळा दाखवणारे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आज एक वेगळाच, रसिकांना अक्षरशः थक्क करणारा पैलू समोर आला. अधिकारी म्हणून ओळख असलेल्या खरात यांच्या अंतरंगात एवढा ताकदीचा तबलावादक आणि सुरेल कलाकार दडलेला आहे, याची प्रचिती उपस्थितांना आली आणि कार्यक्रमस्थळी टाळ्यांचा कडकडाट झाला.

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघातर्फे ‘वृत्तेश्वर’ गणेशोत्सवानिमित्त बालकलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या अंगातील कला जगासमोर यावी यासाठी आयोजित ‘नाच रे मोरा’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुलाबराव खरात यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या प्रारंभीच त्यांच्या हातात तबला आला… आणि पुढचे काही क्षण जणू प्रशासन विसरून संगीताच्या दुनियेत घेऊन जाणारे ठरले!

काय तो तबला वाजवण्याचा अंदाज… काय ती लय… काय तो ठेका! प्रत्येक आघातात आत्मविश्वास, प्रत्येक ठेक्यात संगीताची जाण आणि चेहऱ्यावर कलाकाराचा मनमोकळा आनंद दिसत होता. एवढेच नव्हे, तर त्यांच्या सोबती असणाऱ्या सुरेल आवाजानेही उपस्थितांची दाद मिळवली.

एरवी फाईली, बैठका, विकासकामे आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांत व्यस्त असणारे सीईओ खरात आज मात्र एका वेगळ्याच भूमिकेत दिसले

 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!