spot_img
spot_img

या बरं ऐकायला भजन सम्राज्ञी राधिका जैस्वालांचे सुमधूर भजन! ‘वृत्तेश्वरांच्या’ दरबारी भक्तीच्या सुरेल अभिव्यक्तीचा उत्सव!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘वृत्तेश्वर’ गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आज भजन सम्राज्ञी राधिका जैस्वाल यांच्या सुमधुर वाणीतून ‘भजन संध्या रंगणार आहे.

भजन हा एक आध्यात्मिक आचार आहे जो धार्मिक आणि सांस्कृतिक मर्यादा ओलांडून साजरा केला जातो. भजन गायनाद्वारे शांतता, आनंद आणि एकतेची भावना निर्माण केली जाते. संगीताच्या माध्यमातून भजन भक्तांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आशीर्वाद मागण्यासाठी आणि अंतरात्म्याच्या शांतीसाठी एक वातावरण तयार करतो.

पत्रकार भावनातील ‘वृत्तेश्वर’ गणेशोत्सव मंडळाच्या यंदाच्या गणेशोत्सवात आज सायंकाळी 8 वाजता सैनिकी मंगल कार्यालयात सुनील भजन संध्या संपन्न होत आहे. भजन सम्राज्ञी राधिका जैस्वाल ह्या भजनसंध्या गाजविणार आहेत. नागरिकांनी या भजनसंध्येचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!