spot_img
spot_img

DJचा आवाज नाही, कामाचा ठसा पाहणार पोलीस! डोणगावात ‘गणराया अवॉर्ड २०२६’; कोणत्या मंडळाच्या डोक्यावर चढणार मानाचा मुकुट? मराठी अभिनेते भारत गणेशपुरे यांचे व्हिडिओ आवाहन म्हणाले बुलढाण्याचे एस.पी. निलेश तांबे यांच्या हस्ते होणार गौरव!

डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) गणेशोत्सवाच्या नावाखाली कर्णकर्कश DJ, ध्वनिप्रदूषण आणि बेशिस्त मिरवणुकीला फाटा देत सामाजिक सलोखा, पर्यावरण संवर्धन आणि शांततामय उत्सवाचा आदर्श निर्माण करणाऱ्या गणेश मंडळांसाठी डोणगाव पोलिसांनी यंदा थेट ‘गणराया अवॉर्ड २०२६’ची घोषणा केली आहे.

डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नोंदणीकृत गणेश मंडळांसाठी आयोजित या स्पर्धेत DJमुक्त विसर्जन मिरवणूक, शिस्त, कायदा-सुव्यवस्थेला सहकार्य, पर्यावरणपूरक उपक्रम, सामाजिक एकोपा आणि विधायक कार्यक्रम या बाबींना विशेष महत्त्व दिले जाणार आहे.

विशेष म्हणजे ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविणाऱ्या गावांना आणि मंडळांना विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे. गणेशोत्सव हा केवळ देखावा आणि आवाजाची स्पर्धा न राहता समाजाला सकारात्मक दिशा देणारा उत्सव ठरावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांचा बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

या उपक्रमाची माहिती ठाणेदार गणेश इंगोले आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक अजय अजमिरे यांनी दिली.

दरम्यान, मराठी कलाविश्वातील भारत गणेशपुरे, अंकुश वाढवे आणि योगेश शिरसाठ यांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबाबत नव्हे, तर व्हिडिओ संदेशाद्वारे नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

भक्तीचा उत्सव साजरा करताना ‘आवाजापेक्षा आदर्श मोठा!’ हा संदेश कृतीतून देणाऱ्या मंडळांना आता पोलिसांकडून सन्मानाची पावती मिळणार आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!