बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, अवैध व्यवसाय आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून शिंदेसेना आता पोलिस प्रशासनाविरोधात आक्रमक झाली आहे. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले.
निवेदनात हातभट्टीची दारू, जुगार, वरली मटका, गुटखा, गांजा, अवैध वाहतूक आणि शस्त्रतस्करी सुरू असल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. वाहनचोरी, बेपत्ता अल्पवयीन मुली व तरुण, ऑनलाइन फसवणूक तसेच महिलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
विशेष म्हणजे, पोलिस प्रशासनाने मागील आठ दिवसांत विविध कारवायांमध्ये सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून १५३ आरोपींवर कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र शिंदेसेनेने ही कारवाई अपुरी असल्याचा सूर लावत दीर्घकालीन आणि ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे.
शहरातील अनेक CCTV कॅमेरे बंद असल्याने चोरी, मारामारी व छेडछाडीच्या घटनांच्या तपासात अडथळे येत असल्याचा आरोपही करण्यात आला. महिलांच्या सुरक्षेसाठी असलेले दामिनी पथक अधिक प्रभावी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याच मागण्यांसाठी जुलै महिन्यात आंदोलन करण्यात आले होते. लेखी आश्वासनानंतर ते मागे घेण्यात आले; मात्र अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे













Total Users : 3465542