spot_img
spot_img

‘जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रकरण’ कोर्टात दाखल होण्यास सुरुवात! जिल्हा वकील संघाच्या पाठपुराव्याला यश;शासनाकडे केली होती मागणी!

बुलढाणा (हॅलोबुलढाणा) जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक, २०२६ नुसार जन्म आणि मृत्यू नोंदणी संदर्भातील प्रकरण विद्यमान प्रथम वर्ग न्यायाधीश यांच्या दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. सदरच्या प्रकरणी जिल्हा वकील संघाच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, जन्ममृत्यू नोंदणी बाबत देशभरात एकसमान कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी, तसेच उशिरा होणाऱ्या नोंदणीसाठी स्पष्ट आणि कडक कायदेशीर प्रक्रिया लागू करण्यात यावी, अशी मागणी बुलढाणा जिल्हा वकील संघाच्या वतीने मंगळवार, दि. ९ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या मार्फत शासना कडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. सदरच्या निवेदनात जन्ममृत्यू नोंदणीबाबत विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यपद्धती अवलंबल्या जात असल्याने नागरिकांना अनावश्यक अडचणीत्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले होते. दरम्यान, जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदणी वर नियंत्रण आणण्यासाठी आणि नियम अधिक कडक करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारनेजन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक, २०२६ला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.त्यामुळे जन्म किंवा मृत्यूची नोंद दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी नंतर करावयाची असल्यास संबंधित न्यायालयात करण्यात येणार आहे. या बदलामुळे नोंदणी प्रक्रियेत अधिक शिस्त, पारदर्शकता आणि एकरूपता येणार आहे.

केंद्र सरकारने मंजुर केलेल्या या सुधारणां अधिनियम मधील तरतुदी आणि बुलढाणा जिल्हा वकील संघाने आपल्या निवेदनातून मांडलेले मुद्दे यामध्ये मोठ्या प्रमाणात साम्य दिसून येत आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्हा वकील संघाने उपस्थित केलेल्या विषयाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची भावना जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.विजय सावळे यांनी व्यक्त केली. सदरचे सुधारणा अधिनियम आता लागू झाल्याने विलंबित व संशयास्पद नोंदणीं वर प्रभावी नियंत्रण येण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांना अधिक सुस्पष्ट, पारदर्शक आणि कायदेशीर प्रक्रिया उपलब्ध होणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!