spot_img
spot_img

कोरडा दुष्काळ जाहीर करा, पीएम सन्मान निधीत वाढ करा! उबाठा शिवसेनाची आग्रही मागणी!

धामणगाव बढे (एस बी शेख/ हॅलो बुलढाणा) मोताळा तालुक्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले असून, शासनाने तत्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हप्त्यात वाढ करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली.

या मागणीसाठी धामणगाव बढे येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोताळा तहसीलदार यांना मंडळ अधिकारी यांच्यामार्फत तलाठी जाधव यांना निवेदन सादर केले. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
तसेच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता वाढविण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली. शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना आवश्यक मदत करावी, अशी अपेक्षा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी उबाठा गटा चे शहरप्रमुख रामशंकर सोनवणे, उबाठा चे उपतालुकाप्रमुख मुकुंदा माळी, संघटक राजू बोरसे, बबुलू लेणेकर, शालिग्राम गोरे, डॉ. दिलीप उबाळे, रशिदखा पठाण, श्रीकृष्ण भोरे, गफार कोतवाल, मुक्तार पठाण, धोंडूबा गोरे, मंजूर पटेल, रवी वाघ, मोहन बावस्कर, शाम गोरे, धनराज उबाळे, खलील पटेल यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!