spot_img
spot_img

बुलढाणा वायुवेग पथकाची ‘कर्तव्यतत्परता!’ वाहन थेट रुग्णालयातच थांबले;जखमी महिलेला वेळेत मिळाला उपचार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) रस्त्यावरील सुरक्षितता,वाहतूक नियमांची अंमलबजावणी व अपघातांना आळा घालण्याचे काम मोटार वाहन विभागाचे वायूवेग पथक करत असते. काल 4 सप्टेंबर रोजी मोताळा मार्गावरील खडकी फाटा येथे दुचाकीचा अपघात झाल्याने एका अपघातग्रस्त महिलेला तात्काळ रुग्णालयात पोहचवून वेळीच उपचार मिळवून दिल्याने वायुवेग क्र.1 च्या पथकाची

‘कर्तव्यतत्परता’अधोरेखित झाली आहे.

मोताळा मार्गावरील खडकी फाट्याजवळ 4 सप्टेंबरच्या रात्री 8 वाजता दुचाकीचा अपघात झाला.या अपघातात एसपी ऑफिस मधील कार्यरत कॉन्स्टेबलच्या आई गंभीर जखमी झाल्या होत्या. यावेळी नियमित तपासणीसाठी जाणाऱ्या वायुवेग क्र.1 पथकाला हे अस्वस्थ दृश्य दिसल्याने त्यांनी तात्काळ अपघातग्रस्त महिलेला आपल्या शासकीय वाहनातून बुलढाणा येथील निकम हॉस्पिटलमध्ये योग्य वेळेत पोहोचविल्याने त्यांना उपचार मिळाला आहे. पथकातील जितेंद्र सोनवणे, आशिष इंगळे, सुदर्शन जायभये यांनी अपघातग्रस्त महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी तत्परता दाखवून मोलाची मदत केली.त्यांच्या सोबत वाहन निरीक्षक शितल कुमार कुंभार हे सुद्धा हजर होते. दरम्यान नव्याने रुजू झालेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नव्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन विभागाने बरेच सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. आरटीओ विभागाच्या पाचही वायुवेग पथकांना रस्त्यावरील सुरक्षितता, वाहतूक नियम अंमलबजावणी व अपघातग्रस्तांना तातडीने सहकार्य करण्याच्या आधीच सूचना दिलेल्या आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!