spot_img
spot_img

BIG NEWS! मंत्र्यांची सासरवाडी तहानलेली… कोट्यवधींच्या योजनेत कुणाची झोळी भरली? लोणी गवळीत नळाला पाणी नाही; पण खर्चाचा आकडा २ कोटी ८६ लाखांवर! ‘दोन कोटींवर भ्रष्टाचार; कंत्राटदार जितू सावजी यांच्यावर खासदार जाधव -माजी आमदार रायमुलकरांचा वरदहस्त!’ प्रशांत पाटील यांच्या आरोपाने खळबळ; २७ ऑगस्टपासून बेमुदत धरणे सुरू – पाण्यासाठी ग्रामस्थ मैदानात!

मेहकर (हॅलो बुलढाणा) जल जीवन मिशन अंतर्गत मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथे पाणीपुरवठा योजनेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांचा वरदहस्त असलेल्या कंत्राटदार जितू सावजी यांनी जवळपास 2 कोटींवर भ्रष्टाचार केल्याचा आरोप ना.जाधव यांचे नातेवाईक तथा राष्ट्रवादीचे
(अजित पवार गट) जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी केला असून,या भ्रष्टाचाराविरुद्ध 27 ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे.योजनेत दोन कोटी 86 लाखांवर खर्च होऊनही पावसाळ्यात ग्रामस्थांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

मेहकर तालुक्यातील राजकीय व सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या लोणी गवळी येथे जल जीवन मिशन अंतर्गत जवळपास 4 कोटी 56 लाख 24 हजार रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली.परंतु बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स च्या माध्यमातून जितू सावजी या कंत्राटदाराने जवळपास दोन कोटींवर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.विशेष म्हणजे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची लोणी गवळी ही सासुरवाडी आहे. कंत्राटदाराची मनमानी व प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधीच्या अनास्थेमुळे ग्रामस्थांना टँकरचे पाणी विकत घेऊन आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांचा वरदहस्त असलेले कंत्राटदार जितू सावजी यांनी सदर पाणीपुरवठा योजनेत जवळपास दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून, ग्रामपंचायत व सरपंचांना अंधारात ठेवून आपली पोळी भाजून घेतल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. दरम्यान ग्रामपंचायत समोर 27 ऑगस्ट पासून प्रशांत पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनस्थळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी भेट देऊन आंदोलनाचे समर्थन केले आहे.उन्हाळ्यातली पाणीटंचाई पावसाळ्यातही कायम असल्याने महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. लोणी गवळी गावाला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा तात्काळ करावा, कंत्राटदाराने आजवर खर्च केलेल्या योजनेतील कोट्यावधी रुपयांच्या निधीचा संपूर्ण लेखी हिशेब जनतेसमोर मांडावा,दोषी अधिकारी व कंत्राटदरावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम निर्णय प्रशांत पाटील,माजी उपसरपंच साहेबराव खंडारे,संतोष भांबे पाटील, अंगद भालेराव, शरद चंद्रे यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!