बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पहाटेचे साडेचार वाजले की संपूर्ण जग गाढ झोपेत असतं. पण आमच्या घरात मात्र एका आवाजाने दिवसाची सुरुवात व्हायची..तो आवाज म्हणजे माझ्या बाबांच्या सायकलची साखळी आणि वर्तमानपत्रांच्या गठ्ठ्यांचा पडणारा आवाज. असे शब्द होते मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव व आमदार श्वेता ताई महाले यांचे पती विद्याधर महाले यांचे! त्यांनी म्हटले की, वृत्त आणि पत्रकार यांच्याशी नाळ जुळलेली आहे. पत्रकारांनी केलेला सत्कार माझ्यासाठी ऊर्जा देणारा आहे, यावर उपस्थित त्यांनी टाळ्या घेतल्या.
निमित्त होते पत्रकार भावनात सत्कार सोहळ्याचे!
पत्रकार भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खाजगी सचिव विद्याधर महाले यांचा पत्रकारांच्या हस्ते सत्कारसोहळा आज आयोजित करण्यात आला होता.तो सोत्साह पार पडला. पत्रकारांनी केलेला सत्कार माझ्यासाठी ऊर्जा देणारा असे त्यांनी आवर्जून सांगितले. सुरुवातीला विद्याधर महाले यांची रॅली निघाली. या रॅलीला हजारो समर्थकांनी लावलेल्या हजेरीमुळे संपूर्ण परिसर जनसागराने फुलून गेला होता.
ढोल-ताशांचा गजर, बँजो डीजे च्या आवाजात भव्य रॅली काढण्यात आली. या भव्य रॅलीला सुरुवात धाड नाका येथून झाली.पुढे संगम चौक, जय स्तंभ असा मार्ग होता.
पत्रकारांच्या विनंतीला मान ठेऊन पत्रकार भवन येथे महाले यांनी हजेरी लावली. पत्रकारांच्या हस्ते वाढदिवसा निमित्त सत्कार स्वीकारला. पुढे बोलताना त्यांनी सांगितले पत्रकारांनी केलेला सत्कार माझ्यासाठी ऊर्जा आहे. पत्रकारांसाठी त्यांनी वेळेत वेळ काढून सत्कार स्वीकारला त्याबद्दल पत्रकारांनी आभार मानले.













Total Users : 3378287