spot_img
spot_img

खाकीला सलाम! वर्षानुवर्षांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेनंतर ‘त्या’ अधिकाऱ्यांचा अखेरचा सॅल्यूट; एसपी निलेश तांबेंच्या हस्ते भावपूर्ण निरोप!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कायदा-सुव्यवस्था राखताना ऊन, वारा, पाऊस आणि सण-उत्सवांची पर्वाकरता जनतेच्या सुरक्षेसाठी आयुष्य वेचणाऱ्या बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार आणि कर्मचाऱ्यांना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीनिमित्त भावपूर्ण निरोप देण्यात आला. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळीवाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित या सोहळ्यात खाकी वर्दीतील अनेक वर्षांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला मानाचा मुजरा करण्यात आला.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, पोलीस निरीक्षक बी. डी. पावरा आणि प्रभारी पोलीस उपअधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कुटुंबीयांसह सत्कार करण्यात आला.

सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक विजय यादवराव हुडेकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रईस खाँ अताउल्ला खाँ, सहायक फौजदार अब्दुल अजिज मोहम्मद सौदागर, विष्णू लक्ष्मण मुंडोकार, कोकीळा हतेसिंग तोमर, शिवाजी रामकृष्ण दळवी, पोलीस हवालदार भरतसिंग कैय्यारसिंग राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण भुजंगराव आघाव, जितेंद्रसिंग जयपालसिंग ठाकूर, वरिष्ठ श्रेणी लिपिक अतुल शरद शिराळकर आणि हेड कुक शेख हमीद शेख लतीफ यांचा समावेश होता.

मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, झाडाचे रोपटे, भेटवस्तू आणि साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस अधीक्षक तांबे यांनी सर्वांना निरोगी, आनंदी आणि समाधानी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पोलीस कल्याण शाखेने आयोजित केलेल्या या सोहळ्यास सुमारे ७० कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस कॉन्स्टेबल निलेश रत्नपारखी यांनी केले. अखेरच्या सॅल्यूटवेळी अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या; मात्र प्रदीर्घ सेवेचा अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!