spot_img
spot_img

सातपुडा कॅम्पसवर व्हॉलीबॉलचा ‘महासंग्राम’! ४० संघ मैदानात; विजयासाठी पुरुष-महिला खेळाडूंची दमदार झुंज!

जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) सातपुडा कॅम्पसवर व्हॉलीबॉलचा थरारक महासंग्राम सुरू झाला असून, पुरुष आणि महिला खेळाडूंच्या जोशपूर्ण सहभागाने संपूर्ण परिसर अक्षरशः क्रीडामय झाला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित तसेच सातपुडा शिक्षण संस्था संचालित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑगस्ट रोजी या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले.

 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयातील डॉ. रोहित तांबे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांमधील पुरुषांचे तब्बल २४, तर महिलांचे १६ संघ मैदानात उतरले आहेत. एकूण ४० संघांच्या सहभागामुळे सातपुडा कॅम्पसवर विजयासाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव इंगळे होते. मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन सातव, संचालक डॉ. संदीप वाकेकर, डॉ. हर्षवर्धन देशमुख, डॉ. रवीश राऊत, निवड समिती सदस्य गौरव ठाकरे, ए. डी. लेवाडे, प्राचार्य योगेश गवई, प्राचार्य राहुल तायडे, प्राचार्य डॉ. रविराज उदासी आणि पंच प्रतिनिधी आनंद म्हस्के यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकातून डॉ. रोहित तांबे यांनी खेळाडूंना क्रीडाभावना, शिस्त आणि संघभावनेचा संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात कृष्णराव इंगळे यांनी खेळ हा केवळ विजय-पराभवापुरता मर्यादित नसून व्यक्तिमत्त्व घडविणारी शक्ती असल्याचे ठामपणे सांगितले. शिक्षणासोबत मैदानही गाजवा, असे आवाहन त्यांनी केले

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!