spot_img
spot_img

‘नाम है सिद्धू..!’ सुवर्णपदकावर कोरले नाव.. आता राष्ट्रीय रेकॉर्ड तोडण्याच्या उंबरठ्यावर! 60 मीटर रनिंग स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर निवड!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सिद्धांत रोठेने सुवर्णपदक मिळवत राष्ट्रीय रनिंग स्पर्धेत स्थान निश्चित केले आहे. कोकणातील डेरवणला 27 ते 30 ऑगस्ट 2026 दरम्यान संपन्न होत असलेल्या चाळीसाव्या महाराष्ट्राच्या सोळा वर्षाखालील जुनियर अथलांटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा 30 ऑगस्ट ला संपन्न झाल्या. त्यामध्ये बुलढाणा अमरावती डिव्हिजन तथा नागपूर विदर्भाकडून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सिद्धांत सतीशचंद्र रोठें यांची निवड झाली होती. यासह मराठवाडा, कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागासह महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट 67 खेळाडूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली होती.

कोकणातील डेरवन येथे झालेल्या अंतिम फेरीमध्ये राज्यस्तरीय रनिंग स्पर्धत सिद्धांत ने 7.13 मायक्रो सेकंदात प्रथम क्रमांक मिळवित गोल्ड मेडल मिळविले आहे.
ठाण्याचा धैर्य सूर्यकुमार ने 7.27 सेंकंदात द्वितीय तर लातूरचा आर्यन फेरे यांनी 7.38 सेकंदात तृतीय क्रमांक मिळविला आहे. मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील, विदर्भाच्या भूमीतील खेळाडू म्हणून प्रथमच 60 मीटर रनिंग स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा बहुमान सुद्धा सिद्धूला मिळाला आहे.
आपल्या यशाचे श्रेय सिद्धूने नागपूर येथील शासनाची क्रीडा प्रबोधिनीचे अधिकारी, प्रशिक्षक, तर वैयक्तिक प्रशिक्षक समशेर खान नागपूर, बुलढाणा येथील क्रीडा अधिकारी भक्ती आंबरे, बुलढाणा येथील सरस्वती महाविद्यालय, भारत विद्यालयाचे शिक्षक, प्रशिक्षक, प्रशिक्षक विजय वानखेडे सर, अमरावती येथील क्रीडा अधिकारी अनिल इंगळे सर, बुलढाणा जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनचे सचिव गोपाल दादा राजपूत आणि आई-वडिलांना समर्पित केले आहे.

▪️सिद्धांत रोठे राष्ट्रीय रेकॉर्डच्या उंबरठ्यावर!

तेलंगणाच्या मृदावथ गणेश यांचा 7.6 सेकंदाचा राष्ट्रीय रेकॉर्ड 60 मिटर रनिंग स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड आजपर्यंत कायम आहे. डेरवण येथील राज्यस्तरीय स्पर्धेत कॉटर फायनल मध्ये 7.25 मायक्रोसेंकंद तर सेमी फायनल मध्ये सिद्धांतने 7.10 मायक्रो सेकंदापर्यंत मजलमारीत राष्ट्रीय रेकॉर्ड तोडण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. कोकणातील डेरवण येथे सद्यस्थितीत पाऊस सुरू असल्यामुळे खेळाडूंना अंतिम फेरीत सेमी फायनल पेक्षाही कमी गुणवत्ता सादर करता आली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!