बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे नेहमीच मंत्रालया भोवती दिसून पडतात. त्यांचे अनेक मंत्र्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत.विकासाचे काम घेऊन ते मंत्रालय गाठत असतात. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एका प्रमुख मागणीचा पुन्हा आग्रही पाठपुरावा केला आहे. विजयराज शिंदे यांनी धाड व धामणगाव बढे या गावांना तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे.यापूर्वी त्यांनी ही मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली होती. सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शिंदे या मागणीचा पाठपुरावा करीत आहेत.
सदर मागणीलामुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून,यासोबतच बुलढाणा जिल्ह्यातील विविध विकासकामे आणि संघटनात्मक विषयांवरही चर्चा करण्यात आल्याचे शिंदे म्हणाले.दरम्यान
धाडवं धामणगाव बढे गावांना तालुक्याचा दर्जा देण्यासाठी शिंदे यांनी आग्रह धरला आणि आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, धाड आणि धामणगाव बढे या गावांची लोकसंख्या प्रत्येकी २५ हजारांहून अधिक आहे. आजूबाजूच्या गावांसह एकूण लोकसंख्या १ लाखांपेक्षा जास्त आहे. दोन्ही गावांचा परिसर केंद्रस्थानी असून, ६० ते ७० गावे या ठिकाणी जोडलेली आहेत. सध्याच्या तालुक्याच्या ठिकाणांपासून या गावांचे अंतर अधिक असल्याने नागरिकांना आरोग्य, शिक्षण आणि प्रशासकीय सेवांसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. या गावांमध्ये महाविद्यालय, उच्च माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलिस ठाणे, कृषी सेवा केंद्र, बँका आणि सहकारी संस्था यांसारख्या सुविधा आहेत. त्यामुळे प्रशासनिक दृष्टिकोनातून ही गावे सक्षम असून, फक्त तालुका कार्यालयाची गरज आहे. तालुका दर्जा मिळाल्यास प्रशासन अधिक जवळ येईल. सेवा जलद, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होतील. विकासाचा वेग वाढेल, तेव्हा तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे.











Total Users : 3352162