spot_img
spot_img

ईद मिलादुन्नबीचा आनंदोत्सव! राष्ट्रीय शाह समाज महासभेच्या वतीने प्रसाद वितरण!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या १५०१ व्या जयंतीनिमित्त ईद मिलादुन्नबीचा पवित्रआनंदाचा उत्सव बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने शहरात विविध धार्मिक, सामाजिकसेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शाह समाज महासभेच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही राष्ट्रीय शाह समाज महासभेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष शाहिद शाह यांच्या पुढाकाराने शहरालगतच्या हजरत टिपू सुलतान चौक येथे सकाळी ११ वाजता महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शहरातून निघालेल्या ईद मिलादुन्नबीच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. हजरत टिपू सुलतान चौक येथे मिरवणुकीत सहभागी समाजबांधवांना संघटनेच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमातून धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. मिरवणुकीत सहभागी झालेल्या समाज बांधवांनी प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी तसेच अतिक शाह,नजीर शाह,साजिद शाह,साहिल शाह,जोहेब शाह,शेख रेहान,शाहिद शाह, सोहिल शाह,अलीम शाह,अर्शील खान,जावेद शाह,साद खान, जहिर शाह,तौसिफ शाह,जमीर शाह, यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!