धामणगाव बढे (एस. बि. शेख /हॅलो बुलढाणा) येथील स्मशानभूमीकडे तसेच पिंपळगाव देवीकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन घोंगडे यांनी २५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या मागणी संदर्भात घोंगडे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी १७ ऑगस्ट रोजी संबंधित विभागांना निवेदन देऊन रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती; मात्र निवेदनाची दखल न घेतल्याने त्यांनी शनिवारी (दि. २२) पुन्हा पोलिस प्रशासनासह संबंधित विभागांना निवेदन दिले.
यावेळी मागणी मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. पिंपळगाव देवीकडे जाणाऱ्या सुमारे अर्धा ते एक किलोमीटर रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. रस्त्यावरील गिट्टी उखडून पडल्याने वाहनचालक, शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास २५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा गजानन घोंगडे यांनी दिला आहे.











Total Users : 3335896