बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या पत्नी सौ. अर्पिताताई शिंदे यांनी महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अपरिहार्य कारणांमुळे त्यांचा अर्ज विहित मुदतीत मागे घेता आला नाही. तरीही त्यांनी निवडणूक न लढविण्याची स्पष्ट भूमिका घेत सहकार पॅनलच्या सर्व अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
सहकार क्षेत्राचे व्यापक हित आणि एकसंघ सहकार पॅनलची भूमिका लक्षात घेऊन अर्पिताताई शिंदे यांनी निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. महिला राखीव मतदारसंघातील उमेदवारांसह सहकार पॅनलच्या सर्व अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी सौ. अर्पिताताई शिंदे यांच्या जाहीर पाठिंब्याचे पत्र नामदार आकाश फुंडकर यांच्याकडे सुपूर्द केले. या निर्णयाचे स्वागत करत सहकार क्षेत्राच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने सहकार पॅनलच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
अर्पिताताईंचे नाव मतपत्रिकेवर कायम राहणार असले, तरी त्यांचा पाठिंबा सहकार पॅनलच्या पारड्यात गेल्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना मोठे वळण मिळाले आहे.












Total Users : 3325647