spot_img
spot_img

कॅमेऱ्याच्या ‘क्लिक’मागील व्यथा सरकारला कधी दिसणार? जळगाव जामोदमध्ये छायाचित्रकारांचा एल्गार; डॉ. सतीश हागे यांचा सपत्नीक गौरव!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) जगाच्या आठवणी कॅमेऱ्यात जपणाऱ्या छायाचित्रकारांच्या स्वतःच्या समस्या मात्र शासनाच्या नजरेतून अद्यापही ‘आऊट ऑफ फोकस’ आहेत! याच पार्श्वभूमीवर जळगाव जामोद तालुक्यात १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने सकाळी अक्षरंग स्टुडिओ, दुपारी महालक्ष्मी स्टुडिओ आणि सायंकाळी श्री गजानन महाराज संस्थान परिसरात कॅमेरा पूजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील छायाचित्रकारांनी एकत्र येत शुभेच्छांची देवाणघेवाण केली.

ग्रामीण छायाचित्रकारांच्या अर्थकारणावर पीएच.डी. करणारे डॉ. सतीश हागे यांचा असोसिएशनच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. “विविध घटकांसाठी शासनाच्या योजना आहेत; मात्र छायाचित्रकारांसाठी कोणतीही विशेष योजना अथवा सवलत नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्या संशोधनातून ग्रामीण छायाचित्रकारांची आर्थिक परिस्थिती शासनापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

बदलते तंत्रज्ञान, वाढती स्पर्धा, व्यवसायावरील संकटे आणि भविष्यातील संधींवर यावेळी मंथन झाले. छायाचित्रकारांच्या समस्या शासनदरबारी पोहोचविण्यासाठी संघटित लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. कार्यक्रमाला तालुक्यातील छायाचित्रकार व महिला मंडळाची मोठी उपस्थिती होती. संचालन मुरलीधर सोनवणे यांनी, तर आभार दीपक जाधव यांनी मानले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!