spot_img
spot_img

EXCLUSIVE ‘आम्ही मतदान करावं, तुम्ही खोटं बोलावं.. अन् निवडून आल्यावर तुम्ही आम्हाला कोलावं.. बुलढाण्याचा रस्ता ‘कचरायुक्त’ म्हणू का? स्वच्छ शहर म्हणू का?’

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘आम्ही मतदान करावं, तुम्ही खोटं बोलावं.. अन् निवडून आल्यावर तुम्ही आम्हाला कोलावं.. बुलढाण्याचा रस्ता ‘कचरायुक्त’ म्हणू का? स्वच्छ शहर म्हणू का?’ हे विडंबन आहे वामनदादा कर्डक यांच्या फियाट गाडी या गाण्याचे! सध्या या गाण्याचा ट्रेंड असून, बुलढाण्याचा ‘कचराही’ ट्रेडिंग वर आला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने, अनेक जण अशा विडंबन गीताने प्रशासनाचा बेजबाबदारपणा वेशीला टांगत आहे.यातून लोकप्रतिनिधी ही सुटले नाहीत, हे विशेष!

शहरात निर्माण होणारा घरगुती व रस्त्यावर इतरत्र पडणारा कचरा संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नगर पालिकेने विविध उपाय योजना केल्याचे सांगण्यात येते.या उपायोजनांसाठी करोडो रुपये शासन खर्ची घालते आणि कर्मचारी नियुक्त केलेले आहेत परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी दिसून येत आहे.
शासनाने दिलेल्या निधीतून घंटागाड्या, कॉम्पॅक्टर, जेसीबी, मैला उपसणारी वाहने, जेट मशिन व्हेईकल यासह कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारे सर्व साहित्य वेळोवेळी उपलब्ध केलेले आहेत.मात्र
खर्च करूनही शहरातील कचऱ्याची समस्या कायमच आहे,याचे नवल व्यक्त होत आहे.कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यात नगर पालिकेची यंत्रणा अपयशी ठरल्याचे चित्र आहे.सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीवर म्हणा की,रस्त्याच्या कडेला कचरा उचलण्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी होते. हे समजण्या इतपत बुलढाणेकर दुधखुळे नक्कीच नाहीत.शहरामध्ये प्रत्येक घरातून कचरा संकलन केले जात असताना देखील अनेक भागात नागरिक घरातील कचरा गल्ली किंवा रस्त्याच्या कॉर्नरवर आणून टाकत असल्याने एका अर्थाने बेशिस्त व रोगराईला निमंत्रण मिळत आहे. जागोजागी कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक भरपूर पडलेले आहेत. या कचऱ्यात अन्नपदार्थ असतील ते खाण्यासाठी मोकाट प्राणी येतात. तसेच अन्न सडून त्याची दुर्गंधी पसरते. पाऊस झाल्यावर हा कचरा आजूबाजुला पसरतो.कचरा संकलनाची शिस्त सर्वानी पाळली पाहिजे. तरच आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाहीत.लोकप्रतिनिधी आणि नगरपालिका यंत्रणेने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘कचरा ग्रामपंचायतींचा!’- मुख्याधिकाऱ्यांचा दावा; पण हद्द नेमकी कोणाची?

बुलढाणा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या म्हणण्यानुसार, शहराच्या प्रवेशद्वारांजवळ साचणारा कचरा संबंधित ग्रामपंचायतींच्या हद्दीतील आहे. नगरपरिषदेकडे २६ घंटागाड्या असून शहरात नियमित कचरा संकलन होत असल्याचा त्यांचा दावा आहे.

मात्र, शहरालगतच्या पाच ग्रामपंचायतींतील नागरिकांच्या मते घंटागाडी नियमित येत नाही आणि अधिकृत डम्पिंग ग्राउंडचीही माहिती नाही. ग्रामपंचायत कर घेते, तर सुविधा का देत नाही, असा त्यांचा सवाल आहे.नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींच्या परस्परविरोधी दाव्यांत कचरा मात्र वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनाने स्पष्ट करावे.हद्द कोणाची, जबाबदारी कोणाची आणि कचरा उचलणार कोण?

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!