spot_img
spot_img

स्मार्ट मीटर विरोधात नागरिकांचे ‘मिटर फिरले!’ मीटर बसवण्याची सक्ती केल्यास महावितरणला ‘जोडे मारो’ चा शॉक बसणार!

लोणार (हॅलो बुलढाणा) महावितरणने १३ जून २०२६ रोजी लाखो ग्राहकांना भ्रमनध्वनीवर पाठवलेल्या संदेशात ‘४८ तासांनंतर विद्यमान मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात येईल’ असे नमूद केले. या संदेशामुळे ग्राहकांची पूर्वसंमती गृहित धरली जात असल्याचा आभास निर्माण झाला. त्यामुळे ग्राहक संघटना, काही राजकीय संघटना आणि वीज कर्मचारी संघटनांनी आक्षेप नोंदवला. विशेष म्हणजे, राज्यात आधीपासूनच स्मार्ट मीटरविरोधी वातावरण असताना या संदेशामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. परिणामी लोणार येथे तीव्र विरोध पाहावयास मिळत आहे. दरम्यान

स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा अन्यथा जोडोमारो आंदोलनाचा इशारा रि.सेना जिल्हाप्रमुख, नागवंशी संघपाल पनाड यांनी संबंधितांना दिला आहे.

बुलढाणा जिल्ह्यात स्मार्ट मीटर सक्ती विरोधात वातावरण तापले आहे. सुलतानपूर सह लोणार तालुका बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर महावितरण कर्मचाऱ्यांच्या वतीने सक्तीने बसविण्यात येत आहे, ते तत्काळ थांबवण्यात यावे. सुलतानपूर ग्रामपंचायत च्या वतीने स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये, या संदर्भात ग्रामसभेमध्ये ठराव सुद्धा गावकऱ्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. तरीसुद्धा महावितरण चे अधिकारी- कर्मचारी नागरिकांना दहशतीच्या वातावरणामध्ये जबरदस्तीने गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देऊन स्मार्ट मीटर बसत आहे. ते तात्काळ थांबवण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन उभारण्यात येईल,अशा इशाऱ्याचे निवेदन ऊर्जामंत्रींसह संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. निवेदनावर नागवंशी संघपाल पनाड, अनित्य घेवंदे,अख्तर भाई,दामुअण्ण सुरूशे, पुरूषोत्तम गाडेकर, डॉ.देसाई, गोविंद मंत्री, सुखदेव देसाई,संतोष शिंदे, संतोष पाटील,अमीर भाई, सद्दाम भाई, गणेश रत्नपारखी,असिम पठाण,दामोधर कुकडे, शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!