spot_img
spot_img

EXCLUSIVE जिल्हाधिकारी डॉ.देवरे साहेब! आपल्या पारदर्शी कामाला सलाम! बोटावर मोजणारे अधिकारी उरलेत.!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अधिकारी कोणताही असो, त्यांचा पारदर्शी कारभार असला की, ते जनतेच्या गळ्यातील ताईत व्हायला वेळ लागत नाही. बुलढाण्यातील जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण कुमार देवरे यांचा अल्पावधीत प्रामाणिकपणा आणि सडेतोड भूमिका बुलढाणेकरांच्या पसंतीस उतरत आहे. ‘हॅलो बुलढाणा’ अशा सनदी अधिकाऱ्यांचा सन्मान करते.. आज तर जिल्हाधिकारी डॉ.देवरे यांचा वाढदिवस आहे.. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊया!

राज्यात बोटावर मोजणारे अधिकारी उरलेत असा लोकांचा पक्का समज आहे. त्यात खरेपणा सुद्धा आहे.जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचा बेबाकीपणा, त्यांची धडाकेबाज कारवाई सध्या जिल्ह्याच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. डॉ. प्रवीणकुमार देवरे हे २०१३ च्या बॅचचे भारतीय प्रशासनिक सेवा (IAS) अधिकारी असून, त्यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुलढाणा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी डॉ. किरण पाटील यांच्याकडून, प्रशासकीय फेरबदलादरम्यान हा पदभार स्वीकारला आहे. त्यांनी पुणे येथे पशुसंवर्धन आयुक्त म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. डॉ.देवरे नियमांवर बोट ठेवतात.राजकीय किंवा इतर दबाव मानत नाहीत. सर्वसामान्यांच्या समस्यांना प्राधान्य देतात,असे नागरिक सांगतात.कायदा व सुव्यवस्था राखण्याला त्यांचे प्राधान्य आहे.शासकीय योजना लोकांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्याची त्यांची तळमळ महत्वपूर्ण ठरते.महसूल गोळा करणे आणि भूमी अभिलेखांची देखभाल करणे.आपत्कालीन परिस्थितीत तत्परता,यासारखे त्यांचे निर्णय त्यांची लोकप्रियता वाढविणारे आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!