spot_img
spot_img

मेहकरचा ‘मदतीचा हात’ कायमचा थांबला! दानशूर अजय उमाळकर यांचे मुंबईत निधन; सामाजिक क्षेत्रावर शोककळा

मेहकर (हॅलो बुलढाणा) गरजूंच्या मदतीसाठी सदैव पुढे असणारा हात आणि दानधर्मातून अनेकांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण करणारे मेहकर येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अजय ऊर्फ अजुभाऊ उमाळकर यांचे मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मेहकरसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

अजय उमाळकर हे स्व. अरविंद उमाळकर वृद्धाश्रमाचे अध्यक्ष, तर महाराष्ट्र अर्बनचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांची ओळख होती. सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांसाठी त्यांनी सातत्याने मदतीचा हात पुढे केला. प्रसिद्धीपासून दूर राहून गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हीच त्यांची खरी ओळख होती.

अजुभाऊंच्या जाण्याने वृद्धाश्रमासह सामाजिक क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. एक सच्चा रामभक्त, धर्मनिष्ठ व्यक्तिमत्त्व, उदार दाता आणि सोज्वळ माणूस समाजाने गमावल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

अनेकांच्या संकटात आधार बनलेले अजुभाऊ आज स्वतःच अनंताच्या प्रवासाला निघून गेले. त्यांच्या पावन स्मृतीस हॅलो बुलढाणा परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!