बुलडाणा (हॅलो बुलडाणा) एकीकडे पारदर्शक कर्तव्यदक्ष एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेसळखोरी विरुद्धच्या कारवायांनी जनता खुश आहे तर दुसरीकडे जिल्हा जलसंधारण अधिकारी मुंडे यांच्या 27 वर्षापासूनच्या उदासीन कारभारामुळे शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत वैतागले आहेत.दरम्यान कोर्टाने आदेश दिल्यामुळे जिल्हा जलसंधारण अधिकारी मुंडे यांचे वाहन जप्त करण्यात आले आहे.
बातमी अशी आहे की, मोताळा तालुक्यातील निपाणा येथील शेतकऱ्यांचे शेतजमीन मोबदला प्रकारणे मलकापूर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात प्रलंबित असून दरखास्तीचे आहेत. कोर्टाने निकाल दिला तरी
जिल्हा जलसंधारण अधिकारी मुंडे यांनी शेतकऱ्यांची रखडलेल्या मोबदल्याची रक्कम भरली नाही.परिणामी त्यांचे शासकीय वाहन आज जप्त करण्यात आले आहे.गोतमारा पाझर तलावात मोताळा तालुक्यातील जवळपास 15 ते 16 शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेलेल्या आहेत. या घटनेला सविस्तर 27 वर्ष उलटून गेली आहे. मलकापूर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात शेतकऱ्यांनी खटला जिंकला असून शेतकऱ्यांनी न्यायालयात दरखास्त दाखल केली.न्यायालयाच्या अंतिम आदेशाची वा निकालाची अंमलबजावणी करून घेणे हा या प्रकरणाचा मुख्य उद्देश असतो. परंतू जिल्हा जलसंधारण अधिकारी मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या रखडलेल्या मोबदल्याची रक्कम भरली नसल्याने त्यांच्यावर यापूर्वी खुर्ची जप्तीची नामुष्की ओढावली होती.आता पुन्हा त्यांची शासकीय गाडी जप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.एकीकडे कर्तव्यदक्ष राज्यात तुकाराम मुंढे आपल्या धडाकेबाज कारवाईने भेसळखोरांना जेरीस आणत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीला वाह वाह मिळत आहे तर दुसरीकडे जिल्हा जलसंधारण अधिकारी मुंडे हे शेतकऱ्यांना मोबदल्याचा न्याय देण्यात तब्बल 26 ते 27 वर्ष अपयशी ठरत असुन, त्यांच्या विरोधात शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.















Total Users : 3303813