spot_img
spot_img

बुलढाण्याच्या वीरू चे अमरावतीत ‘शोले’ आंदोलन धगधगले..लेखी आश्वासन घेऊनच गजानन बोरकर टॉवरवरून उतरले! सारंगपूर ग्रामपंचायतचा ‘ब्लॅक’ कारभार ‘हॅलो बुलढाणा’ च्या स्क्रीनवर येताच यंत्रणा हादरली!

मेहकर (अविनाश लाड/हॅलो बुलढाणा) वारंवार तक्रारी करूनही सारंगपूर ग्रामपंचायतच्या कथित मनमानी कारभाराची चौकशी करण्यास प्रशासकीय यंत्रणा जाणीवपूर्वक डोळेझाक करत होती.त्यामुळे यशवंत सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख गजानन बोरकर यांनी अमरावती शहरातील सातूर्णा परिसरात मोबाईल टॉवरवर चढून १२ तास ‘शोले’ आंदोलन केल्याने यंत्रणा खडाडून जागी झाली अन् कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने बोरकर टॉवर वरून खाली उतरून आंदोलनाला स्थगिती दिली आहे.विशेष म्हणजे ‘हॅलो बुलढाणा’ ने या आंदोलनाची सर्वप्रथम बातमी व्हिडिओ सहित परखड वृत्त प्रसारित केल्याने यंत्रणेची तारांबळ उडाली होती.

जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये येणाऱ्या सारंगपूर ग्रामपंचायतच्या कथित मनमानी व बेजबाबदार कारभारा विरोधात यशवंत सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख गजानन बोरकर यांनी अमरावती शहरातील सातूर्णा परिसरात मोबाईल टॉवरवर चढून १२ तास केले. ‘हॅलो बुलढाणा’ च्या बातमीसह अनेक रिलस्टार यांनी रिलच्या माध्यमातून आंदोलन सम्राट गजानन बोरकर यांना शोले स्टाईल आंदोलक म्हणून संबोधले आणि त्यांना पाहण्यासाठी अक्षरशः मुख्य रस्त्यावरील वाहतूक जाम करून टाकली होती. गजानन बोरकर हे गुरुवारी उत्तररात्री, दि.१४ ऑगस्ट रोजी सुमारे रात्री ३ वाजता सातूर्णा परिसरातील मोबाईल टॉवरवर चढले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी सुमारे ३ वाजता, म्हणजे जवळपास १२ तासांनी ते खाली उतरले. सारंगपूर ग्रामपंचायतच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराबाबत बोरकर यांनी यापूर्वी विभागीय आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या.मात्र,या तक्रारींवर अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
अभिलेख सील करण्यासह चौकशीची मागणी
सारंगपूर ग्रामपंचायतशी संबंधित सर्व रेकॉर्ड व अभिलेख तातडीने सील करण्यात यावेत, ग्रामपंचायतीच्या कारभाराची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित सरपंच, ग्रामसेवक,गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या भूमिकेची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी बोरकर यांनी केली. याशिवाय गावातील पाणीपुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढावा,अशीही मागणी त्यांनी केली.

▪️प्रशासनाची घटनास्थळी धाव!

बोरकर टॉवरवर चढल्याची माहिती मिळताच प्रशासन व संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे 50 फूट उंचीवरील टॉवरवर बोरकर असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. त्यांनी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न झाल्यास आत्महत्येचा इशारा दिला व 50 फुटावरून जवळपास 200 फुट उंचावर गेल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले. अधिकाऱ्यांनी बोरकर यांच्याशी चर्चा करुन त्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर आयुक्त यांचे आदेशानुसार बुलडाणा जिल्हा प्रशासनाची दमछाक झाल्याने मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खरात,कृषी विस्तार अधिकारी मेटांगळे व विस्तार अधिकारी गवई यांनी अमरावती येथे जाऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर गजानन बोरकर यांनी आंदोलन मागे घेतले आणि ते टॉवरवरुन खाली उतरले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!