spot_img
spot_img

गौरव! 101 वेळा रक्तदान करून ज्येष्ठ पत्रकार विलास खंडेराव यांनी जोडले गरजवंतांशी ‘रक्ताचे नाते!’ पालकमंत्र्यांनी केले ध्वजारोहण सोहळ्यात सन्मानित!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) रक्तदात्यांचा सन्मान हा समाजात मानवी मूल्ये आणि निस्वार्थ सेवेचा गौरव करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग असून, 101 रक्तदान शिबिरात ज्येष्ठ पत्रकार विलास खंडेराव यांनी रक्तदान करून अनेक गरजवंतांशी ‘रक्ताचे नाते’ जोडल्याने त्यांचा मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांच्या उपस्थितीत मुख्य ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी सन्मान करण्यात आला आहे.

रक्तदान जीवनदान आहे.रक्तदान करणे हे मानवतेचे कार्य आहे.विलास खंडेराव हे गेल्या अनेक वर्षापासून
पत्रकारिता जोपासत असून सामाजिक क्षेत्रातही वावरतात.साहित्यिक म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांनी 101 रक्तदान शिबिरात रक्तदान करण्याचे योगदान दिले आहे. समाजाचे आपण काही देणं लागतो या भावनेतून खंडेराव यांनी रक्तदान करण्याचे ठरविले.त्यांची ही भूमिका समाजासाठी प्रेरणादायी आहे.
त्यांच्या या रक्तदानाच्या सेवाकार्याचा गौरव व्हावा आणि इतरांना सुद्धा प्रेरणा मिळावी या उद्देशाने 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात त्यांचा पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे.यावेळी अनेक मान्यवरांची व नागरिकांची उपस्थिती होती.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!