spot_img
spot_img

‘डिजिटल अरेस्ट’ फसवणुकीचा पर्दाफाश!जेष्ठांची तब्बल दोन कोटींनी फसवणूक; 52,77,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत! बुलढाणा सायबर पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) डिजिटल अरेस्टची भीती दाखवत नांदुरा येथील ज्येष्ठांची तब्बल दोन कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीला बुलढाणा सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. आरोपींकडून आतापर्यंत एकुण 52,77,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या सायबर गुन्ह्याचा मध्यबिंदू राजस्थान असल्याची शक्यता वर्तविला जात असून या दिशेने अधीक तपास केला जात आहे.

डिजिटल अटक हा सायबर गुन्ह्यातील नवा प्रकार आहे. जिल्ह्यातील नांदुरा येथील सीनियर सिटीजनला चक्क दोन कोटी रुपयांचा आरोपींनी गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे गुन्हा नोंद आहे. दरम्यान या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिस निरीक्षक गजानन कांबळे यांनी तपासचक्र फिरविले असता, पथकाने दिनांक 03 ऑगस्ट 2026 रोजी अहिल्यानगर येथून आरोपी शुभम नांगल याला उचलले. त्याला पॉलिसी खाक्या दाखविल्यानंतर मिळालेल्या माहितीचे आधारे दिनांक 13 ऑगस्ट रोजी मुंबई येथून आरोपी धनराज ऊर्फ रॉबीन विष्णाराम विष्णोई (वय 21 वर्षे) रा.जोधपुर राजस्थान आणि आरोपी मुनाफ शेख अनवर शेख (वय 23 वर्षे) रा.अहिल्यानगर यांचा ठाणे येथे सिनेस्टाईल पाठलाग केला आणि आरोपीतांवर पाळत ठेवुन दोघांना 5 लाख रुपयांचा चेक विड्रॉल करतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सदर कार्यवाहीमध्ये आतापर्यंत NCCRP पोर्टलवर जवळपास ₹ 31,00000 तसेच आरोपी शुभम नांगल याच्या गोल्ड लोण अकाउंटवर ₹ 14,00000 आणि आरोपी रॉबीन व मुनाफ हे रंगेहाथ चेक विड्रॉल करतांनाचे ₹ 5,00000  आरोपींकडुन जप्त करण्यात आले. शिवाय त्यांच्याकडून ₹ 1,27,000 किमतीचे ॲप्पल आणि अँड्रॉइड मोबाईल व MRM पोर्टलच्या माध्यमातून ₹ 1,50,000 असा एकुण 52,77,000 रुपयांचाचा मुददेमाल गोठविण्यात आला आहे. गजाआड केलेल्या आरोपींकडून माहिती घेतली असता, तपासाची सेन्ट्रल कमांड राजस्थान येथे असण्याचे चिन्ह दिसत आहेत. सिनियर सिटीझनचे ऑनलाईन सायबर गुन्ह्यात गेलेले ₹ 2 कोटी परत मिळविण्यासाठी बुलढाणा सायबर पोलीस शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. पोलीस अधिक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधिक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांचे आदेशाने सायबर पोलीस स्टेशनचे एएसआय शकील खान, एचसी प्रशांत गावंडे, एचसी राजदीप वानखडे, एचसी विक्की खरात, एचसी राजु आडवे पीसी कैलास ठोंबरे, पीसी राहुल इंगळे,पीसी क्षितीज तायडे, पीसी शुभम बोराडे या पथकाने गुन्ह्याशी संबधीत सर्व बँक डिटेल्स, आरोपींचे प्राप्त जी मेल आयडी, मोबाईल नंबर यांची पडताळणी करुन नमुद आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींना नांदुरा येथील न्यायालयात हजर केले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान सध्या ट्रेन्डमध्ये असलेल्या डिजीटल अरेस्ट, टास्क फ्रॉड, शेयर मार्केट ट्रेडींगचे नावाखाली लोकांना भुर्दंड घालणाऱ्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्म पासून सावध राहाण्याचे तसेच अशा प्रकारे जनसामान्यांबरोबर सायबर फ्रॉड झाल्यास आपली तक्रार तात्काळ NCCRP पोर्टलवर (1930) नोंदवावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!