बुलढाणा (हॅलो बुलढाणा) रक्तदान म्हणजे माणुसकीचे खरे भान आणि निरपेक्ष सेवेचे प्रतीक आहे. रक्तदानामुळे दरवर्षी लाखो लोकांचे प्राण वाचवले जात आहेत.आपले थोडेसे रक्त कोणाचा तरी अमूल्य जीव वाचवू शकते. त्यामुळे रक्तदान करा व माणुसकीचा धर्म पाळा,असे विचार जमीयत अहेले हदीसचे जिल्हा प्रमुख मिनहाज खान यांनी व्यक्त केले.
शहरातील गवळीपूरा येथील जमीयत अहेले हदीस संयुक्त इस्लामिक गार्डन्स सेन्टरच्या वतीने मोहम्मदी मस्जिद मध्ये जीवनरक्षक रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
रक्तदान शिबिरात सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप तडवी, जमीयत अहेले हदीस चे ज्येष्ठ शेख रहीम बाबू जिल्हा जमीयत अहेले हदीसचे जिल्हा प्रमुख मिनहाज खान, नदीम खान, डॉ. सिफाअत, डॉ. कमर, आय. जी. सी. चे उमेर देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जमीयत अहेले हदीस संयुक्त आएजीसीच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यावेळीही शिबिर उत्साहात पार पडले. या मोहिमेत संकलीत झालेले रक्त जीवनधारा बुलढाना अर्बन ब्लड सेंटरला दान करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप तडवी म्हणाले की, रक्तदान शिबिरासारख्या उपक्रमांची समाजाला गरज आहे. अशा कार्यक्रमामुळे मानवतेचा संदेश तर जातोच शिवाय चांगल्या वातावरणाची निर्मिती होम रक्तदान चळवळीला बळकटी मिळते. तसेच उमेर देशमुख यांनी जमीयत अहेले हदीस व आयजीसीच्या माध्यमातून दर महिन्याला गरजू लोकांना,विधवा महिलांसाठी शहरातील 90 घरापर्यंत राशन किट पोहोचविल्या जाते.ही मानवतेची सेवा आहे. जमीयत अहले हदीसच्या वतीने मोहम्मदी दस्तरखान सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गोरगरीब, गरजूंना दोन वेळीचे संपुर्ण जेवण शुद्ध शाकाहारी विनामूल्य उपलब्ध आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तक रजिस्टर आणि गरजू रुग्णांना औषध देण्यात येते. अव्वामी बैतूल माल, जमीयत अहेले हदीस, इस्लामिक मार्गदर्शक केंद्राच्या वतीने पुर्ण वर्षभर मदत कार्य सुरु आहे. दान करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गरजूंना अन्न- पाणी देणे आहे.हे कार्य इस्लाम धर्मात उत्तम कार्य समजल्या जाते.
जमियत अहेले हदीस संयुक्त अव्वामी बैतुल मालच्या वतीने बुलडाणा बस स्टँड, चिखली स्टॉप, बाजार लाईन, टिपू सुलतान चौकात पाणपोई लावण्यात आली असल्याची माहिती उमेर देशमुख यांनी यावेळी दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जमियत अहेले हदीस, अव्वामी बैतूल माल आणि आयजीसीचे कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.










Total Users : 3291855