spot_img
spot_img

BIG BREAKING! सुट्टी मिळाली अन् घराच्या ओढीने बुलढाण्याकडे निघाला ‘तो’ जवान… पण चाळीसगावजवळ धावत्या रेल्वेत घडले भयंकर! राजेश्वरनगरात पोहोचली काळीज चिरणारी बातमी; जिल्ह्याचे दोन सुपुत्र काळाने हिरावले!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यावर दुःखाचा दुहेरी आघात झाला आहे. चिखली तालुक्यातील सेलसूर येथील पॅरा कमांडो हरिदास कापसे यांच्या वीरमरणाचे दुःख ताजे असतानाच बुलढाणा शहरातील आणखी एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

बुलढाणा शहरातील राजेश्वरनगर येथील रहिवासी जवान मनोज मच्छिंद्र कांबळे (वय ३२) हे कर्तव्यावरून सुट्टी घेऊन बुलढाण्याकडे येत होते. प्रवासादरम्यान चाळीसगावजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने त्यांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. राजेश्वरनगरसह संपूर्ण बुलढाणा शहरात शोककळा पसरली आहे.

देशसेवेचे व्रत हाती घेतलेल्या अवघ्या ३२ वर्षांच्या जवानाचा असा अकाली अंत झाल्याने प्रत्येकाचे काळीज हेलावले आहे. एका बाजूला सेलसूरचे शूर पॅरा कमांडो हरिदास कापसे यांच्या वीरमरणाने जिल्हा सुन्न असतानाच दुसरीकडे मनोज कांबळे यांच्या अपघाती मृत्यूने बुलढाण्याला आणखी एक मोठा धक्का बसला. जिल्ह्याचे दोन उमदे सुपुत्र काळाने हिरावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पॅरा कमांडो हरिदास कापसे आणि जवान मनोज मच्छिंद्र कांबळे या दोन्ही सुपुत्रांना ‘टीम हॅलो बुलढाणा’कडून भावपूर्ण श्रद्धांजली!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!