spot_img
spot_img

मंत्रालयात ठरली ‘डेडलाइन’… चिखलीच्या भूमीवर उभी राहणार ₹६५ कोटींची भव्य ‘शिवसृष्टी’! आमदार श्वेता महालेंच्या पाठपुराव्याला मोठे यश; पर्यटनमंत्र्यांचा थेट आदेश -‘१५ दिवसांत DPR द्या, निधी कमी पडू देणार नाही!’

चिखली (हॅलो बुलढाणा) विधानसभा मतदारसंघाच्या पर्यटन विकासाला ऐतिहासिक कलाटणी देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने आता निर्णायक टप्प्यात प्रवेश केला आहे. आमदार श्वेता महाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हातणी आणि वळती परिसरात सुमारे ₹६५ कोटी खर्चातून ‘छत्रपती शिवाजी महाराज हेरिटेज थीम पार्क तथा शिवसृष्टी’ साकारण्याच्या हालचालींना मोठा वेग मिळाला आहे.

पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात या प्रकल्पाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील, आमदार श्वेता महाले, सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

“या प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. येत्या १५ दिवसांत सविस्तर प्रकल्प अहवाल DPR तयार करून शासनाकडे सादर करा,” असे स्पष्ट निर्देश पर्यटनमंत्री देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिले. आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समितीतूनही निधी देण्याची ग्वाही पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिली.

प्रस्तावित शिवसृष्टीमध्ये शिवकालीन इतिहासाचे संग्रहालय, अत्याधुनिक ३६० अंश डोम शो, भव्य प्रवेशद्वार, खुला रंगमंच, सभागृहे, परिषद केंद्र, बँक्वेट हॉल, एमटीडीसी रिसॉर्ट, फूड कोर्ट, क्राफ्ट बाजार आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा उभारण्यात येणार आहेत.

हा प्रकल्प साकारल्यानंतर चिखली हे अजिंठा, लोणार, सिंदखेडराजा आणि शेगावला जोडणारे विदर्भाचे पर्यटन प्रवेशद्वार ठरणार आहे. स्थानिक रोजगार, हॉटेल, वाहतूक, हस्तकला आणि उद्योगांना नवी झळाळी मिळणार असून, आमदार श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून चिखलीच्या विकास इतिहासात नवा ‘शिवअध्याय’ लिहिला जाणार आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!