spot_img
spot_img

जुना वाद उफाळला अन् थेट डोक्यात घातली कुऱ्हाड! गुळभेली शिवार हादरले!

धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा/ सादिक बिस्मिल्लाह शेख) मोटारसायकलने घरी परतणाऱ्या एका तरुणाला रस्त्यात अडवून जुन्या वादाच्या कारणावरून डोक्यात लोखंडी कुऱ्हाडीने वार करून जिवाने मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना गुळभेली ते रोहणखेड रोडवरील नदीच्या पुलाजवळ घडली आहे. या हल्ल्यात पुंडलिक गणेश पिसे (वय ३५, रा. खामखेड, ता. मोताळा) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. वैष्णवी पुंडलिक पिसे यांचे पती पुंडलिक पिसे हे २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास रोहणखेड येथून डेअरीवर दूध पोहोचवून आपल्या मोटारसायकलने खामखेड येथे घरी परत येत होते. गुळभेली शिवारातील नदीच्या पुलाजवळ आरोपी गणेश नामदेव वायाळ (वय २१, रा. खामखेड) याने त्यांची गाडी थांबवली. जुन्या किरकोळ वादाचा राग मनात धरून गणेश याने पुंडलिक यांना जिवाने ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर लोखंडी कुऱ्हाडीने जोरदार वार केला. यात पुंडलिक पिसे हे गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी फिर्यादी सौ. वैष्णवी पिसे यांच्या तक्रारीवरून धामणगाव बढे पोलीस ठाण्यात आरोपी गणेश वायाळ याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २६०/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ (१), ३५१ (२), ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून ३० जुलै रोजी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी (खामगाव, चार्ज बुलढाणा) मा. प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) निखिल निर्मळ करत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!