मेहकर (हॅलो बुलढाणा/अनिल मंजुळकर) दहशत पसरविण्याच्या उद्देशाने वाहनात धारदार तलवार बाळगणाऱ्या एका आरोपीला मेहकर पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनासह 3 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्तीची 28 जुलै रोजी कारवाई केली आहे. विशाल अशोक गायकवाड (36) रा.दिवाणी कोर्ट मेहकर असे या आरोपीचे नाव आहे.
पांढऱ्या रंगाच्या इंडिगो कार मध्ये विशाल अशोक गायकवाडने दहशत पसरविण्याच्या उद्देशाने धारदार तलवार बाळगल्याची गुप्त माहिती मेहकर पोलिसांना मिळाली होती. दरम्यान पोलिसांनी जानेफळ चौकातील मेहकर -डोणगाव मार्गावरील लालाजी वाईन बार समोर सदर पांढऱ्या रंगाची एमएच 37 जी 5170 क्रमांकाची इंडिगो कार उभी दिसुन आली.या कारची झाडाझडती घेतली असता, कार मध्ये धारदार पात्याची तलवार आढळून आली.
आरोपीला विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. दरम्यान आरोपी विशाल अशोक गायकवाड याने जानेफळ चौकातील लालाजी वाईनबार समोर सार्वजनिक ठिकाणी लोकांना धाक दाखविण्याचे उददेशाने तसेच एकादा गंभीर स्वरुपाचा दखलपात्र गुन्हा करण्याचे उददेशाने त्याच्या ताब्यातील कारमध्ये विनापरवाना अवैधरित्या एक धारधार शस्त्र तलवार
जवळ बाळगतांना पंचांसमक्ष मिळुन आल्याने तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कलम 37 (1) (3) महा. पो.कायदा या आदेशाचे उल्लंघन केल्याने आरोपीविरुध्द पो.स्टे. मेहकर येथे अप.क्र. 507/2026 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 कलम 4/25
तसेच सहकलम 135 महा. पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
ही कारवाई ही पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविपोअ
मेहकर संतोष खाडे तसेच यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, Asi अशोक गाढवे, पोहेकॉ विजय बेंडवाल, पोहेकॉ. प्रभाकर शिवणकर, पोहेकॉ. लक्ष्मण कटक, पोकों मोहम्मद परसुवाले, पोकों गणेश वैदय, पोका मनिष बाजड,
चालक पोकॉ. शिवाजी चिम पो.स्टे. मेहकर यांनी केली आहे.












