spot_img
spot_img

BIG BREAKING : ‘PCR वाढवणार नाही, गुन्ह्यात मदत करतो… पण ₹५ हजार द्या!’ बिबी पोलीस ठाण्याचा हेडकॉन्स्टेबल लाच घेताना रंगेहात; किनगाव जट्टू बसस्थानकावर ACB चा सापळा!

बुलढाणा, दि. २८ जुलै (हॅलो बुलढाणा) गुन्ह्यात मदत करण्यासाठी थेट पैशांची मागणी करणे बिबी पोलीस ठाण्यातील एका पोलीस हेडकॉन्स्टेबलला चांगलेच महागात पडले. तक्रारदाराच्या भावाचा आणि पुतण्याचा पोलीस कोठडी रिमांड (PCR) वाढवू नये तसेच दाखल गुन्ह्यात मदत करावी, यासाठी कथितरित्या ₹६ हजार ते ₹७ हजारांची लाच मागितल्याचा आरोप असलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबल सतिष रामभाऊ नागरे यांना बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ₹५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर ACB ने २८ जुलै रोजी लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणीत तडजोडीनंतर ₹५ हजार स्वीकारण्याची संमती दिल्याचे समोर आल्याचे ACB ने म्हटले आहे.

त्यानंतर लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू बसस्थानकावर सापळा रचण्यात आला. पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ₹५ हजार स्वीकारताच ACB पथकाने नागरे यांना ताब्यात घेतले.

सतिष नागरे हे बिबी पोलीस ठाण्यात हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असून त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ACB ने दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे व बुलढाणा ACB पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!