spot_img
spot_img

नावापुढे लागलं ‘डॉ.’… बुलढाण्याच्या प्रियंकाने नेमकं असं काय केलं, की संपूर्ण जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण ठरावा अशी उल्लेखनीय कामगिरी प्रियंका चित्तरंजन राठी यांनी केली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने फार्मास्युटिकल सायन्सेस विषयातील त्यांच्या संशोधनाला मान्यता देत त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या या यशामुळे चिखलीसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रियंका राठी यांनी “Studies on Gums and Mucilages Obtained from Plant Material for Their Sustained Release Property” या विषयावर सखोल संशोधन केले. वनस्पतींपासून मिळणाऱ्या गम्स आणि म्युसिलेजच्या औषधांमधील ‘सस्टेन्ड रिलीज’ गुणधर्मांचा त्यांनी अभ्यास केला.

हे संशोधन अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी, चिखली येथील संशोधन केंद्रात प्राचार्य डॉ. कैलास आर. बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. अंतिम ओपन डिफेन्समध्ये चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेज, लातूरचे प्राचार्य डॉ. अविनाश टेकाडे यांनी बाह्यपरीक्षक म्हणून संशोधनाचे परीक्षण केले. यावेळी प्रियंका राठी यांनी संशोधनाची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि निष्कर्ष प्रभावीपणे सादर करत उपस्थितांच्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरे दिली.

पीएच.डी. पदवी मिळाल्यानंतर प्रियंका राठी यांच्यावर विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी मार्गदर्शक, विद्यापीठ, कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांना दिले

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!