spot_img
spot_img

शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाताय? मग गाडी कुठेही लावू नका! अर्ध्या तासात दुचाकी गायब; संस्थेच्या पार्किंगचाच वापर करा!

शेगाव (हॅलो बुलढाणा) संत नगरी शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आपली दुचाकी अधिकृत पार्किंगमध्येच उभी करावी, अन्यथा क्षणाची चूक मोठा आर्थिक फटका देऊ शकते, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील निरंजन श्रीकृष्ण भागवतकार हे २० जुलै रोजी दुपारी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे आले होते. लवकर घरी परतायचे असल्याने त्यांनी संस्थानच्या अधिकृत पार्किंगमध्ये दुचाकी न लावता लहुजी वस्ताद चौकातील पुतळ्यासमोर निळ्या रंगाची हिरो HF Deluxe दुचाकी उभी केली आणि दर्शनासाठी मंदिरात गेले.

अवघ्या अर्ध्या तासानंतर ते परतले असता दुचाकी जागेवरून गायब होती. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल न मिळाल्याने त्यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलीस हवालदार गणेश वाकेकर यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.

भाविकांनो सावधान! शेगावला दर्शनासाठी येत असाल, तर आपली गाडी संस्थानच्या अधिकृत पार्किंगमध्येच सुरक्षितपणे उभी करा!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!