spot_img
spot_img

चिखलीत मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश! डी.बी. पथकाचा २४ तासांत दणका; मेहकरचा चोर मुद्देमालासह जेरबंद

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) शहरातून चोरी गेलेल्या मोटारसायकल प्रकरणात चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने अवघ्या २४ तासांत जबरदस्त कामगिरी करत आरोपीला मुद्देमालासह अटक केली. ४ जून रोजी फिर्यादी यांनी आपली हीरो कंपनीची HF डीलक्स मोटारसायकल क्रमांक MH 28 BM 3913 ही चिखली बसस्थानकाजवळील देशी दारूच्या गल्लीतील नाव्हीच्या दुकानाजवळ उभी केली होती. काही वेळानंतर परत आल्यावर मोटारसायकल गायब असल्याचे लक्षात येताच शोध घेऊनही ती न मिळाल्याने तक्रार दाखल करण्यात आली.

याप्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. ५४२/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या सूचनेनुसार डी.बी. पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार आरोपी मेहकरकडून चोरीची मोटारसायकल घेऊन चिखलीकडे येत असल्याची माहिती मिळताच कोलारा फाटा येथे सापळा रचण्यात आला.

संशयितास थांबवून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चेचिस व इंजिन नंबर तपासल्यावर हीच चोरीची मोटारसायकल असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी वसीमखान बब्बु खान, वय ३५, रा. पैनगंगा नगर, मेहकर याने चोरीची कबुली दिली. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!