spot_img
spot_img

जिल्हाधिकाऱ्यांचा माणुसकीचा पुढाकार; टीबी रुग्णाला 6 महिन्यांसाठी घेतले दत्तक!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दि.18 प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाला गती देण्यासाठी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी स्वतः पुढे येत प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. त्यांनी एका टीबी रुग्णाला पुढील सहा महिन्यांसाठी दत्तक घेतले असून, या काळात त्या रुग्णाच्या पोषण आहाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे.

‘निक्षय मित्र’ योजनेअंतर्गत टीबी रुग्णांना औषधोपचाराबरोबरच सकस आहार मिळावा, यासाठी पोषण सहाय्य दिले जाते. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी संबंधित रुग्णाची भेट घेऊन त्याला पोषण आहार किट सुपूर्द केले. या किटमध्ये गहू, ज्वारी किंवा बाजरी, डाळी, खाद्यतेल तसेच दूध किंवा दूध पावडर यांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर खेरोडकर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी स्पष्ट केले की, टीबी हा केवळ आरोग्याचा विषय नसून समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. दानशूर व्यक्ती, अधिकारी, लोकप्रतिनिधी, संस्था आणि उद्योजकांनी ‘निक्षय मित्र’ म्हणून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या संवेदनशील उपक्रमामुळे बुलढाणा जिल्ह्यात टीबीमुक्तीच्या लढ्याला नवी दिशा मिळाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!