spot_img
spot_img

कांदा बियाणे चोरट्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या! देऊळगाव राजा हद्दीत LCB ची धडाकेबाज कारवाई; 5.21 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे अटकेत

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात कांदा बियाणे चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. देऊळगाव राजा हद्दीतील पिंपळनेर येथील जूब्बूजी मायोमास ब्रिकेट इंडस्ट्री कंपनीतून अथर्व सीड्स कंपनीचे तब्बल 6 क्विंटल 65 किलो कांदा बियाणे चोरीला गेले होते. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.

गोपनीय माहितीच्या आधारे LCB पथकाने जालना, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात धाडसी कारवाई करत अंकुश खंदारे, विनोद काळे आणि भानूदास उर्फ राहुल गायकवाड या तिघांना मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून 5 क्विंटल 36 किलो कांदा बियाणे, दोन मोटारसायकली आणि तीन मोबाईल असा एकूण 5 लाख 21 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या नेतृत्वाखाली LCB पथकाने केली असून पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!