spot_img
spot_img

भय्यूजी महाराज आश्रमाजवळ मध्यरात्री नेमकं काय घडलं? शाहरुख खानच्या तोंडी रिपोर्टनंतर खामगावात खळबळ!

खामगाव (हॅलो बुलढाणा) शहरात मध्यरात्री घडलेल्या एका मारहाणीच्या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. भय्यूजी महाराज आश्रमाजवळ टायर पंचर झाल्यानंतर थांबलेल्या वाहनचालक आणि त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीवर काही जणांनी हल्ला केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खान रऊफ खान, वय 30, रा. झोडगाव ता. खामगाव, हे टाटा कंपनीच्या 1616 गाडी क्रमांक MH 28 BB 6388 वर चालक म्हणून काम करतात. 11 जूनच्या रात्री साडेअकराच्या सुमारास ते शिवाजी चंद्रसिंग चव्हाण यांच्यासोबत खामगाव येथील अग्रवाल फटाका केंद्रातून फटाक्याचा माल घेऊन मुंबईकडे निघाले होते. NH 53 बायपास रोडवर भय्यूजी महाराज आश्रमाजवळ गाडीचे टायर पंचर झाल्याने त्यांनी साईराम ढाब्याजवळ गाडी उभी केली.

याच दरम्यान शाहरुख खान आणि शिवाजी चव्हाण हे भय्यूजी महाराज आश्रमाकडे गेले असता समीर शेख नामक व्यक्ती आपल्या 2 ते 3 मित्रांसह तेथे आला. “तुम्ही इथे काय करत आहात?” असे विचारत त्याने शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. शिवाजी चव्हाण यांनी शिवीगाळ करू नका, असे म्हटल्यावर वाद चिघळला आणि समीर शेख व त्याच्या साथीदारांनी दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी आरोपींनी शिवाजी चव्हाण यांचे डोके आश्रमाच्या कमानीवर आपटले तसेच रस्त्यावर पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

शाहरुख खान यांच्या तोंडी रिपोर्टवरून शिवाजीनगर पोलिसांनी अप. क्र. 231/2026 नुसार BNS कलम 118(1), 115(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज राठोड करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!