मेहकर (हॅलो बुलढाणा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या सलग बारा वर्षांच्या कार्यकाळानिमित्त मेहकर येथे आज श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. देशसेवेचा हा प्रवास अखंड सुरू राहावा आणि पंतप्रधान मोदी यांना निरोगी, दीर्घ आयुष्य लाभावे, या भावनेने केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी श्री शारंगधर बालाजी महाराजांच्या चरणी मनोभावे आरती अर्पण केली.
मेहकर येथील श्री शारंगधर बालाजी मंदिरात 12 जून रोजी आयोजित या कार्यक्रमात मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वात भारताने विकासाचा नवा मार्ग स्वीकारला असून जागतिक पातळीवर देशाची वेगळी ओळख निर्माण झाल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या आरती सोहळ्यास माजी आमदार संजय रायमुलकर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, दिलीपराव देशमुख, किसनराव बळी, सुरेश वाळुकर, जयचंद बाढीया, डॉ. सुभाष लोहिया, बबनराव भोसले, बबनराव तुपे, रामेश्वर म्हस्के, ओम सोभागे, विशाल काबरा, मनोज जाधव, मंगेश गायकवाड यांच्यासह शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.












Total Users : 3545084