spot_img
spot_img

चिकन प्लेट खाल्ली… पीस खिशात टाकले अन् मोबाईल घेऊन पसार! खामगावात ‘भुकेला चोर’ चर्चेत

खामगाव (हॅलो बुलढाणा) शहरातील मस्तान चौक परिसरात एक भन्नाट चोरीचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद ज्युस सेंटरमध्ये चिकन प्लेट खाण्यासाठी आलेल्या एका अनोळखी ग्राहकाने खाणंही केलं, घाईघाईत पैसेही दिले; पण जाताना हॉटेल मालकाचा मोबाईल मात्र ‘बोनस’ म्हणून उचलून नेल्याचा आरोप आहे.

फिर्यादी कमरुद्दीन अब्दुल कय्यूम यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या हॉटेलमध्ये चार्जिंगला लावलेला Realme कंपनीचा मोबाईल अचानक गायब झाला. विशेष म्हणजे, संशयित ग्राहक चिकन खाताखाताच काही पीस खिशात टाकत होता. त्यानंतर 100 रुपये देऊन तो मोटारसायकलवरून एवढ्या घाईत निघून गेला की मालकाला संशय आला. फ्रीजवर ठेवलेला मोबाईल पाहिला असता तो गायब!

त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून घाईघाईने जाताना दिसल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!