धाड (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथे आयोजित भव्य दिव्य कार्यक्रमात प्रा. डॉ. रिझवान खान यांना “राजर्षी शाहू राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार – 2026” प्रधान करण्यात येणार आहे.
धाड, जि. बुलढाणा येथील रहिवासी असलेले प्रा. डॉ. रिझवान खान हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 26 जून 2026 रोजी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या गौरवपूर्ण निवडीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रा. डॉ. रिझवान खान हे सध्या धाड येथील नॅशनल पब्लिक स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड ज्युनियर कॉलेज चे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, ते एक उत्कृष्ट सामाजिक परिवर्तक म्हणून ओळखले जातात. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच त्यांना या सन्मानासाठी निवडण्यात आली आहे आहे.










