बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात आज वातावरण चांगलेच तापले असून पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी (श.प) काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी २८ एप्रिल रोजी बुलढाण्यात आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनादरम्यान ‘शिवाजी कोण होता?’ या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे जाहीर वाचनही करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
या पार्श्वभूमीवर शहरातील आमदार गायकवाड यांच्या कार्यालयाजवळ मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त उभा केला आहे. शहरातील प्रमुख ठिकाणी पोलिसांची नाकेबंदी करण्यात आली असून संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, रोहित पवार प्रत्यक्षात बुलढाण्यात येणार की नाही, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. मात्र, त्यांच्या येण्याच्या शक्यतेने प्रशासन सतर्क झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे.
एकूणच, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून परिस्थितीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.










Total Users : 3288508